16.9 C
New York
Friday, April 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

नगर परिषद प्राथमिक शाळा क्रंं.२ येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम उत्साहात

शेंदुरजनाघाट – स्थानिक नगर परिषद प्राथमिक शाळा क्रंं.२ येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थी राधाकृ ष्ण, गोपिका तसेच सुदामा यांच्या वेशभुषेमध्ये मोठ्या उत्साहात उपस्थित राहिले.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थी आणि पालकांचा या कार्यक्रमात सहभाग बघता शाळा अक्षरश: गोकु ळच बनली होती. या गोकुळातील बालगोपालांच्या लीला आणि उत्साहाने उपस्थितांचे डोळे दिपवुन टाकले. भारतीय संस्कृ तीची जपवणुक करण्याच्या दृष्टिकोनातुन मुख्याध्यापक भाऊराव हरले यांचे मार्गदर्शनाखाली तसेच सर्व शिक्षक साहेबराव उईके, हेमंतकुमार धानोरकर, प्रेमकुमार कापरे, विजयकुमार इंगळे, रीना पुरी, सुनीता उपासे, मोनिका भोंगाडे, कल्याणी बिडकर, सोनाली भुंबरकर तसेच सर्व कर्मचा:यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्विरित्या पार पडला.

Related Articles

ताज्या बातम्या