वरुड – पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम शहापुर येथील वार्ड क्र.३ मधील अंगणवाडी केंद्राजवळील जुगार अड्डयावर नुकताच वरुड पोलिसांनी छापा टाकून ५ आरोपींना ताब्यात घेतलस् असून एक आरोपी पोलिसांची चाहुल लागताच घटनास्थळावरुन पसार झाला आहे.
ठाणेदार अवतारङ्क्षसग चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सुरेश कांबळे, मिनेश खांडेकर, मनोज टप्पे, संतोष वंजारी, आकाश आमले यांनी शहापुर येथील वार्ड क्र.३ मधील अंगणवाडी जवळील जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी काहींनी तेथुन पळ काढला परंतु, जुगार खेळत असतांना पोलिसांनी रेहान काजी जमिल काजी (२०), प्रकाश सुरेश राऊत (२२), गुलाब सोमपाल वरखडे (२१), शुभम देविदास फुले (२४), प्रशांत जगदीश कसावरे (२७) यांना ताब्यात घेतले आहे. आकाश नागवंशी हा घटनास्थळावरुन पसार झाला आहे. यावेळी पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला.