वरुड – श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित, महात्माफुले कला, वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय महात्मा फुले महाविद्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात मशरुम निर्मिती, विक्री व प्रक्रिया या विषयीची एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा फुले व डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमा पुजनाने झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रा.डॉ.दि.वि.हांडे तर प्रमुख उपस्थितीत मशरुम तज्ञ प्रा.डॉ.गणेश हेडाऊ व उद्योजक एम.बी.कांबे, प्रमोद येवतीकर, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.एस.व्ही.सातपुते, डॉ.सुनिल कोंडुलकर उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ.गणेश हेडाऊ यांनी विद्याथ्र्यांना मशरुमची ओळख, लागवडीची पद्धत, त्यासाठी पोषक वातावरण, मदर कल्चर, स्पॉन तयार करणे, कुटाराचे निर्जंतुकीकरण करुन बॅग भरणे, बॅगमध्ये स्पॉनची पेरणी कशा पद्धतीने करावी? याविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच मशरुम निर्मिती हा शेतीपुरक व्यवसाय असल्याने शेतकरी, शेतमजुर, युवक, महिलाही करु शकतात. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त मिळकतीचा व्यवसाय आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर तसेच मानवाच्या विविध आजारांवरही गुणकारी व उपयुक्त अशी ही वनस्पती असुन त्यामधुन मानवी आरोग्यासाठी पुरक अशी प्रथिने व पोषण द्रव्ये मिळतात म्हणुन त्याचा दैनंदिन आहारामध्ये वापर करणे आवश्यक आहे, असे म्हटले. सभागृहाबाहेर मशरुम पासुन तयार केलेल्या विविध पदार्थांच्या विक्रीस उत्तम प्रतिसाद मिळाला.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वनस्पतिशास्त्र मंडळाचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थींनी मंडळाच्या अध्यक्षपदी मलिये, सचीवपदी पाटणकर यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर भारसिंगी येथील अरविंदबाबु देशमुख महाविद्यालयाचे विद्याथ्र्यांही सहभागी झाले होते. या कार्यशाळेत एकुण ११० विद्याथ्र्यांनी सहभाग नोंदविला होता.
कार्यशाळेचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजय सातपुते, संचालन प्रा.केदार, तर आभार प्रा.शुभम साखरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.सुरेंद्र सिनकर, कल्याणी आंडे, संकेत सिरसाट, नरेंद्र्र पाटील, नरेंद्र तिडके यांनी परिश्रम घेतले.