वरुड – येथुन जवळच असलेल्या सुरळी येथील जय गुरुदेव महिला भजनी मंडळाच्या भगिनी गावागावांमध्ये जावुन समाजप्रबोधन व जनजागृती करीत आहे.
सुरळी गावातील जय गुरुदेव महिला भजनी मंडळाने गेल्या ३० वर्षापासुन विविध गावांमध्ये जावुन विविध संताच्या जयंती पुण्यतिथी व सप्ताह होणा:या उत्सवा निमित्य आपले पालखी व भजनी मंडळ घेवुन समाजप्रबोधन व जनजागृती केली असुन व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, ग्राम स्वच्छता, साक्षरता अभियान, शेतकरी, आत्महत्या, वृक्ष लागवड, सर्वधर्मसमभाव पाणी जिरवा, आदर्श ग्राम, अनिष्ट रुढी पंरपरा, हगणदारीमुक्त ग्राम करणे, हुंडाबळी अशी फार मोठी कार्य हे महिला मंडळाने गावा-गावामध्ये जावुन भजन व दींडीच्या माध्यमातुन करत आहे.
याकरीता प्रमुख प्रचारक जनानाई श्रीराम ताथोडे, अध्यक्ष सिंधु रामहरी टेकोडे, सचिव मंदा भाऊराव जावळे, उपाध्यक्ष शकुंतला शामराव वानखडे, कोषाध्यक्ष उषा मधुकर वानखडे, सदस्य बेबी साहेबराव सातंगे, सविता विजय सोनारे, नर्मदा गणपत दाभाडे, सरस्वती भिमराव काकडे, कमला पदमाकर बहुरुपी, शिला सुभाष निकम, निर्मला नारायण हेलोडे, निर्मला भिमराव बोबडे, पियुष विजय सोनारे आदींचा समावेश आहे.