वरुड – डेबुजी महाराज ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था जरुडच्या वतीने येत्या १ सप्टेंबर रोजी जरुड येथील बारी समाज सांस्कृतिक भवन येथे सभासद गुणवंत पाल्याचा गुणगौरव सोहळा व सेवानिवृत्त सभासद, कर्मचा:यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जरुडचे माजी सरपंच तथा माजी सैनिक सुधाकर मानकर तर बक्षिस वितरक म्हणुन वरुडचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण उपस्थित होते. यावेळी विशेष अतिथी म्हणुन माजी प्राचार्य तथा माजी उपसरपंच उल्हास तडस राहणार आहे. सदर कार्यक्रम महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष रविंद्र बानगळे, माजी जि.प.पुष्पलता सातपुते, माजी सरपंच गणेश मानकर, भावना सातपुते उपस्थित राहतील.
या सभासद गुणवंत पाल्याचा गुणगौरव सोहळा व सेवानिवृत्त सभासद, कर्मचा:यांचा सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन डेबुजी महाराज ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था जरुडच्या वतीने अध्यक्ष रविंद्र सुरजूसे, उपाध्यक्ष रमेश मालधुरे, संचालक अशोक दारोकर, मधुकर ढोरे, नामदेव वसुले, रमेश दातीर, धनराज वानखडे, राजेंद्र लाड, ज्ञानेश्वर बनसोडकर, भैय्याजी धुर्वे, रेखा राऊत, योगीता ढोरे, शेषराव दारोकर, प्रतिभा बंदे, विजय फुसे, अनंत पोकळे, प्रतिभा बंदे, विजय फुसे, अनंत पोकळे, हरिविजय रानोटकर, अनुप मानेकर, सारीका सोनारे, डॉ.शरद कावळे, सजय पाटील, सुरेंद्र काकडे, प्रविण नथीले आदींनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.