वरुड – अमरावती पांढूर्णा महामार्गावरील वरुड शहरातील पथदिवे संपुर्ण गेल्या महिनाभरापासुन बंदावस्थेत असून ऐन पावसाळयाच्या दिवसांमध्ये अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून या रस्त्याने चोरट्यांचा हैदोस असल्यामुळे एखादी अनुचित घटना केव्हाही घडू शकते, त्यामुळे या मार्गावरील पथदिवे तातडीने सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सविस्तर माहीतीनुसार, गेल्या ५ ते ६ वर्षांपुर्वी अमरावती ते पांढूर्णा महामार्गाचे सिमेंटीकरण करुन या महामार्गावरील प्रत्येक गावात महामार्ग प्राधिकरणाकडून पथदिवे लावण्यात आले आहेत. या महामार्ग प्राधिकरणाकडे या रस्त्याच्या देखभालीचे सुध्दा काम आहे परंतु कोणत्याही प्रकारची देखभाल महामार्ग प्राधिकरणाकडून केल्या जात नाही. या महामार्गावरील अनेक गावांमधील पथदिवे बंदस्थितीमध्ये असुन या बंद पथदिव्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे परंतु महामार्ग प्राधिकरणाचे निगरगट्ट अधिकारी मात्र याकडे हेतुपूरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे. शहरालगत असलेल्या रिंग रोडने हा महामार्ग गेला असून या रस्त्याने आतार्यंत अनेकदा लुटामारीच्या घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत पथदिवे बंद असल्यामुळे महिलांची सुरक्षा सुध्दा ऐरणीवर आली आहे. विशेष म्हणजे दररोज पहाटे आणि रात्री अनेक नागरिक सहकुटूंब फिरायला जात असल्यामुळे एखादेवेळेला अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे त्यामुळे या मार्गावरील पथदिवे तातडीने सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
गेल्या महिन्याभरापासुन जरुड मार्गापासुन ते पुसला मार्गापर्यंतचे सर्व पथदिवे बंद आहेत परंतु महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी त्याकडे डोळेझाकपणा करीत आहेत, ऐन पावसाळयात रस्त्याने अंधार राहात असल्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात होत आहे, अनेकांना कायमचे अपंगत्व प्राप्त झाले आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचा विचार करुन तातडीने या रस्त्यावरील पथदिवे सुरु करावे, अशी मागणी युवा व्यावसायिक विरेंद्र देशमुख यांनी केली आहे.
Home ताज्या बातम्या महामार्गावील पथदिवे महिन्याभरापासुन बंदावस्थेत लुटमारीसह महिलांची सुरक्षा धोक्यात : तातडीने सुुरु करा