9.7 C
New York
Thursday, April 10, 2025

Buy now

spot_img
spot_img

काटी जिल्हा परिषद शाळेमध्ये दहीहंडी स्पर्धेत विद्यार्थीनींनी मारली बाजी

वरुड – काटी जिल्हापरिषद पुर्व माध्यमिक शाळेमध्ये गोकुळाष्टमीचे औचित्य साधुन चिमुकल्या विद्याथ्र्यांकरीता दहीहंडी कार्यक्रम घेण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थीनींनी दहीहंडी फोडुन बाजी मारली.
जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळा काटी येथे चिमुकल्या मुलींचा गोविंदा गट, कृष्णा गट, कान्हा गट, तर मुलींचा राधा गट, दहीहंडी कार्यक्रमाकरीता तयार करण्यात आला होता. त्यामध्ये मुलांपेक्षा विद्यार्थीनींनीच छोटेखानी मनोरा उभारुन दहीहंडी फोडल्याने मुलींच्या राधा गटाला विजेता घोषित केले.
चिमुकल्या मुलींनी प्रयत्नाची पराकाष्टा करुन मनो:याचे उत्कृष्ट प्रदर्शन दाखविल्याने त्यांचे शाळेतील शिक्षकांनी भरभरुन अभिनंदन केले. मुलांपेक्षा मुली कमी नाहीत हे दाखविण्याचा प्रयत्न या दहीहंडी कार्यक्रमातुन मुलींनी दाखवुन दिला. शाळेतील काही मुलींनी दहीहंडीच्या गाण्यावर नृत्य केले.
दहीहंडीच्या कायक्रमाचे प्रास्ताविक संजय फुटाणे, संचालन प्रदीप गणोरकर तथा उपस्थितांचे आभार सुनिता वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमाकरीता शाळेतील शिक्षक गजानन बिजवे, शिक्षिका कांचन कुटे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

ताज्या बातम्या