वरुड – भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि ईअर टॅगिंग असल्याशिवाय १ जून २०२४ नंतर कोणत्याही जनावराची राज्यात खरेदी-विक्री करता येणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय घेतला. ३१ मार्चपर्यंत टॅगिंग बंधन करण्यात आले होते. आता ही मुदत दि. ३१ मे २०२४ पर्यंत वाढविण्यात आली. विशेष म्हणजे हे टॅगिंग असल्याशिवाय शासनाच्या पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवाही बंद केल्या जाणार आहेत.
पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता तसेच प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार ईअर टॅगिंग आणि भारत पशुधन प्रणालीवर जनावरांची नोंद बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे जनावरांची जन्म-मृत्यूची नोंदणी, प्रतिबंधात्मक औषधोपचार, लसीकरण, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क, खरेदी-विक्रीची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे.
कोणत्याही प्रकारच्या जनावरांची ईअर टॅगिंगशिवाय वाहतूक केल्यास संबंधित वाहतूकदार, जनावरांचे मालक यांच्यावर कारवाई होणार आहे. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का, तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे टॅगिंग असल्याशिवाय मालकांना नुकसानभरपाई मिळणार नाही. जनावरांच्या विक्रीकरिता वाहतूक करताना राज्यातील जनावरांचे टॅगिंग असल्याची खात्री करूनच पशुधन विकास अधिकारी, पशुसंवर्धन सहायक आयुक्त आरोग्य प्रमाणपत्र व वाहतूक प्रमाणपत्र देणार आहेत.
ना उपचार, ना आर्थिक मदत
भविष्यामध्ये येणा:या पशुधनाच्या योजना यांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे. त्याशिवाय उपचार केले जाणार नसल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली आहे.
पशुधनप्रणालीवर नोंद बंधनकारक
शेतक:यांनी जनावरांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.त्याशिवाय भविष्यात पशुधन योजनांचा लाभ मिळणार नाही.
१ जूनपासून अंमलबाजवणी
ईअर टॅगिंगची दि. १ जून २०२४ पासून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याशिवाय कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री करता येणार नाही.
टॅगिंगशिवाय खरेदी विक्रीला बंदी
कोणत्याही प्रकारच्या जनावरांची ईअर टॅगिंगशिवाय वाहतूक करण्यावर बंदी राहणार आहे. जनावरांना टॅगिंग नसल्यास संबंधित वाहतूकदार, जनावरांचे मालक यांच्यावर कारवाई होणार आहे तसेच टॅगिंग असल्याशिवाय खरेदी-विक्रीला बंदी करण्यात येणार आहे.
भारत पशुधन प्रणालीवर शेतक:यांनी जनावरांची नोंद आणि ईअर टॅगिंग करणे आवश्यक आहे. आपल्या जनावरांचा ईअर टॅग काढू नये अथवा तोडू नये. जनावराचा टॅग पडला असेल किंवा जनावरांची नवीन खरेदी केली असेल तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये त्याची नोंदणी करून घ्यावी. भविष्यामध्ये येणा:या पशुधनाच्या योजना यांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन अधिका:यांनी दिली.