वरुड – ध्रिती वेलफेअर ग्रुपद्वारा संचालीत ध्रितीस किडझी आणि ध्रितीस ग्लोबल स्कूल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी शाळेचे विद्यार्थी श्रीकृष्ण व राधा यांची वेशभुषा करुन सहभागी झाले शाळेत श्रीकृष्ण व राधा वेशभुषा स्पर्धा ठेवण्यात आली होती तसेच दहीहंडीचे पुजन करुन विद्यार्थानी उत्साहात दहिहांडी फोडली.
श्रीकृष्ण वेशभुषा स्पर्धेचे परीक्षण गावंडे यांनी केले. यावेळी विद्याथ्र्यांनी वेगवेगळ्या प्रकारे राधाकृष्णाची वेशभुषा धारण केली होती. स्पर्धेत सम्राट दुर्गे, हितांश मोघे, मन्नती वानखडे, वल्लभ फुटाणे, रिशांत जयस्वाल, सिवण्या सुमित जयस्वाल, अनघा आशिष दिघेकर, वैधही घोरमाडे, मनोज बोरेकर हे सर्व चिमुकले विजेते ठरले.
या प्रसंगी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग ही उपस्थित होता. सर्वानी विद्याथ्र्यांचे खुप-खुप कौतुक केले, कार्यक्रमाची सांगता उपस्थित पाहुण्यांचे आभार मानुन झाली. याप्रसंगी प्राचार्या परिणीती जयस्वाल तसेच सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचा:यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या नियोजन केले.
Home आरोग्य व शिक्षण ध्रितीस किडझी अॅन्ड ध्रितीस ग्लोबल स्कूल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी