वरुड – महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मंजुर सिंचन विहिरीवरील कामाचे मस्टर विनाविलंब काढणेसाठी नुकतेच विक्रम ठाकरे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती वरुड यांना निवेदन दिले.
या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, वरुड तालुक्यात सिंचन विहिरीचे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामे ब:याच प्रमाणात चालु असून ते कामे शेतक:यांना पावसाळ्यापुर्वी पुर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी कामास सुरुवात केलेली असून काही शेतक:यांच्या सिंचन विहिरीच्या कामास सुरुवात झालेली आहे तर काही कामे सुरु असून काही कामे अंतिम टप्प्यात आहे. सदर कामे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत चालु असून या कामांचे मस्टर आपणांकडे सादर करावे लागते परंतु आपण ते मस्टर काढण्यास विलंब लावत आहे व मस्टर काढण्यात येऊ नये, असे आदेश सुद्धा दिलेले आहे. तरी आपल्या या धोरणांमुळे शेतक:यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
पावसाळ्यापूर्वी शेतक:यांचे या सिंचन विहिरीचे कामे होणे अत्यंत गरजेचे आहे. करीता कोणत्याही शेतक:यांचे मस्टर न अडवता विना विलंब ते मस्टर काढुन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सुरु असलेले सिंचन विहिरीचे कामे पुर्ण करण्याकरीता सहकार्य करावे, अन्यथा आपणाकडून शेतक:यांना असाच त्रास झाल्यास आम्हाला जन आंदोलन छेडावे लागेल, असा सूचक इशारा सुद्धा विक्रम ठाकरे यांनी सदर निवेदनातुन गटविकास अधिकारी पंचायत समिती वरुड यांना दिला आहे.