वरुड – नुकताच महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत विज्ञान शाखेतुन यश रविंद्र सुरजुसे हा नरखेड तालुक्यातुन प्रथम तर वरुड, मोर्शी व काटोल तालुक्यातुन दुसरा ठरला.
या परीक्षेत गणित विषयात ९७, जीवशास्त्र ९४, भौतिकशास्त्र ८६ तर रसायनशास्त्र ९३ गुण प्राप्त करत एकुण सहाशे पैकी ५१६ गुण प्राप्त करत गुणवत्ता यादीमध्ये आपले स्थान निश्चित केले. या यशाचे श्रेय अरविंदबाबु देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश पवार, प्राध्यापक हर्षल कु:हाडे, प्रा.हेमंत कोरडे, प्रा.अनिल नांदगावे, प्रा.राहुल चोपडे, प्रा.अश्विनी नागदिवे व सरस्वती कोचिंग क्लासचे मार्गदर्शक राठी यांना देतो. याचे प्राथमिक शिक्षण न्यु ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट वरुड येथे सीबीएससी पॅटर्नमधुन १० वीपर्यंतचे पुर्ण केले. दहाव्या वर्गात असतांना अगदी थोड्या गुणांनी त्याचा गुणवत्ता यादीमध्ये येण्याचा क्रम काही तांत्रिक बाबीमुळे पुर्ण करु न शकल्यामुळे आपण निश्चितच बारावीमध्ये प्रथम येण्याचे इच्छा मनाची बाळगुन आपल्या अथक प्रयत्नाने त्याला हे यश संपादन करता आले.
त्याच्या या गुणवत्तेबद्दल माझी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख, आमदार देवेंद्र भुयार, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, माजी सभापती विक्रम ठाकरे, खासदार डॉ.अनिल बोंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बोहरुपी, बाळुभाऊ कोहळे, सरपंच सुधाकर मानकर, उपसरपंच शैलेश ठाकरे, तंटामुक्ती अध्यक्ष रविंद्र बानगळे, विष्णु राऊत, शिवाजी वानखेडे, नामदेव वसुले, भिमराव हरले, दीपक होले, सुधीर धर्मे, अशोक दारोकर, रमेश मालदुरे, महादेव राऊत, ज्ञानेश्वर बनसोडकर, धनराज वानखडे, भैयाजी धुर्वे, रमेश दातीर, डॉ.शरद कावळे, संजय पाटील, प्रविण नथिले, सुरेंद्र काकडे, सारिका सोनारे, रेखा राऊत, प्रतिभा बंदे, राजेंद्र लाड, मधुकर ढोरे, अनंता पोकळे, विजय फुसे, प्रशांत डकरे, सोनल फुटाणे, प्रविण धर्म, रुपेश वसुले, पंकज भोसले, प्रमिला कठाळे, शितल पाटील, रुपेश सुरजुसे, राहुल सुरजुसे, शुभम करड भाजणे, ऋषी करळ भाजणे, कार्तिक वेलसरे, रविंद्र पोकळे, योगिता ढोरे, सुरज पाटील, पंकज टोगसे, हर्षलता भोजने, हर्षल बिजवे, अरुणा कोहळे, लक्ष्मी गोस्वामी, अलका घारपुरे, किरण ठाकरे, माया कथलकर, सुरेंद्र ठाकरे, प्रभाकर भाकरे, बंडुभाऊ सटवेठ, ईश्वर कडु यांनी अभिनंदन केलेले आहे.