जरुड – माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पृथ्वी या तत्वावर जरुड ग्रामपंचायत कडुन ७५ हजार वृक्ष लागवड करण्यात आली.
याकरीता जिल्हा परिषद अमरावती उपकार्यपालन अधिकारी, (पंचायत) यांचा पाहणी दौरा उपमुख्य कार्यपालन अधिकारी, पंचायत जिल्हा परिषद अमरावती बाळासाहेब बायस नव्यानेच रुजु झाले. त्यांनी अमरावती जिल्हातील उत्कृष्ठ कामगिरी करणा:या ग्रामपंचायतीचा पाहणी दौरा अमरावती जिल्हातील मोठी ग्रामपंचायत व वरुड तालुक्यातील पंचायत समिती वरुड मधील सर्वात मोठी ग्रामपंचायत जरुड यांनी माझी वसुंधरा अभियान व अटल भुजल ग्रामसमृध्दी अभियानात झालेल्या कामाची नव्यानेच रुजु झालेल्या गटविकास अधिकारी सतीष देशमुख यांच्या सोबत जरुड गावाची पाहणी केली. ग्रामपंचायतचे प्रशासक व ग्रामविकास अधिका:यांचे अभिनंदन व तोंडभरुन कौतुक केले व माजी सरपंच तथा माजी सैनिक सुधाकर मानकर यांच्या कामाची व गावाला पुरस्कार मिळवुन दिल्याबदल उपमुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी प्रशंसा केली. समोर सुद्धा अशीच कामे चालु राहावी, याकरीता मार्गदर्शन सुद्धा केले.