वरुड – शहरातील मेन रोड परिसरात वास्तव्यास असलेले अष्टपैलु व्यक्तीमत्व, सिनेस्टार तथा सेवानिवृत्त तहसिलदार कमलाकर देशमुख यांच्या तेरे नाम ‘हेअर स्टाईल’ने नागरिकांचे लक्ष वेधले त्यांचेसोबत सेल्फी घेऊन त्यांचा हा तेरे नाम हेअर स्टाईल लुक कॅमेरात कैद करतांना दिसुन येत आहे.
संत्रानगरी वरुड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कला कौशल्याने ओळखल्या जात असलेले सेवानिवृत्त तहसिलदार कमलाकर देशमुख हे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहतात. सर्प मित्र, पर्यावरण प्रेमी, सिनेस्टार, जादुगर, उत्कृष्ट डान्सर यासह अनेक माध्यमातून ते नेहमीच आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधुन त्यांना आकर्षित करतात. गेल्या काही महिन्यात त्यांनी तेरे नाम हेअर स्टाईल करुन दोन मराठी चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केले आहे. या हेअर स्टाईल मध्ये त्यांचा चाहता वर्ग मिळेल त्या कार्यक्रमात त्यांचेसोबत फोटो किंवा सेल्फी काढुन आपआपल्या मोबाईलमध्ये कैद करीत आहे.
कमलाकर देशमुख यांच्या या नाविण्यपुर्ण उपक्रमामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.