शेंदूरजनाघाट – येथे आज दुपारच्या सुमारास जोराचा वादळी वारा व पावसाने धुमाकूळ घातला यात अनेकांच्या घरावरील छप्पर उडाले तसेच स्थानिक तलाठी कार्यालयावर झाड कोसळल्याने कार्यलयाचे नुकसान झाले. वादळी वा:यामुळे विजेचे खांब वाकल्याने विज पुरवठा खंडित झाला असून शेतमालाचेही नुकसान झाले आहे. या वादळी पावसामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
शेंदूरजनाघाट येथे आज दुपारी ४ च्या सुमारास वादळी वा:यासह पाऊस सुरु झाला. यावेळी जोराच्या वादली वा:यामुळे अनेक घरावरील टिनपत्रे, छप्पर उडाली. रमेश कडू यांचे घरावरील छप्पर उडून बाजूच्या घरावर आदलल्याने त्यांचे सुद्धा नुकसान झाले. वादळी वा:यामुळे स्थानिक रिंग रोड व वाई रस्त्यावरील विजेचे खांब पडल्याने विजपुरवठा बंद झाला आहे. स्थानिक तलाठी कार्यालयावर रस्त्यालगतचे मोठे कडुलिंबाचे झाड कोसळल्याने तलाठी कार्यालयाचे नुकसान झाले. स्थानिक रिंग रोड तसेच वाई रोडवरील विद्युत खांब पडले, नगरपरिषद शाळा क्र.२ जवळील नगरपरिषद सभागृह समोरील मोठे झाड पडल्याने विद्युत खांबचे दोन भाग झाले. शहरात मोठमोठे झाडे उन्मळुन पडली. या वादळामुळे अनेकांचे नुकसान झाले असून मंडळ अधिकारी देवानंद मेश्राम व तलाठी चेतन छकुले याच्या नुकसानग्रस्त ठिकाणी भेटी देणे सुरू होते. यावेळी संत्रा, मोसंबी झाडे उन्मळून पडल्याने शेतक:यांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
Home ताज्या बातम्या वादळी वारा व पावसामुळे शेंदुरजनाघाट परिसर हादरला लाखोंचे नुकसान : रात्री उशिरापर्यंत...