6 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

युवकाची गळफास घेवुन आत्महत्या : मलकापूर येथील घटना

शेंदूरजनाघाट – मलकापूर येथील पंकज रमेश घोरपडे नामक २७ वर्षीय युवकाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.
मृतक पंकज हा काही प्रमाणात वेडसर असल्याचे त्याचेवर अमरावती येथील डॉ.श्रीकांत देशमुख यांचेकडे उपचार सुरु असल्याचे कुटूंबियांनी सांगितले. आज सकाळच्या सुमारास स्वयंपाक खोलीतील गॅस ओट्याजवळ घराचे स्लॅबचे लोखंडी हुकेला नायलॉन दोरीने गळफास घेतला. याबाबत कुटंूबियांना माहीती मिळताच पोलिसांना पाचारण करण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी साहेबराव लक्ष्मणराव घोरपडे (५४) यांचे फिर्यादीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली असुन पुढील तपास ठाणेदार सतिश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन महाजन, मदत उईके तपास करीत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या