वरुड – महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे बारावीच्या निकाल नुकताच घोषीत झाला असून स्थानिक जागृत नवयुवक शिक्षण संस्था व्दारा संचालित जागृत कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान, वाणिज्य, कला व एम.सी.व्ही.सी.विभागाचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट लागला असुन यश प्राप्त केलेल्या सर्व विद्याथ्र्यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
त्यामध्ये वाणिज्य शाखेतून आयुष मगर्दे हा ९०.५० टक्के गुण घेवुन प्रथम, उत्कर्षा गावंडे ८७.१७ टक्के गुण घेवुन व्दितीय तर दिपाली शेकार ही ८३.३३ टक्के गुण घेवुन तृतीय आली आहे. विज्ञान शाखेतून कैवल्य उत्तम बन्सोड हा ९०.६७ टक्के गुण घेवुन प्रथम, अंशुन मनोहर आंडे ८४.३३ टक्के गुण घेवुन व्दितीय तर वेदांत दिलीप कांबळे ८२.६७ टक्के गुण घेवुन तृतीय, व्होकेशनल विभागातून हर्षल साहेबराव मोरेकर ६९.८३ टक्के प्रथम, गायत्री हेमराज वाघमारे ६४.५० टक्के व्दितीय तर कविता रमेश यावले ही ६४ टक्के गुण घेवुन तालुक्यातून तृतीय आली आहे. कला विभागातून भुमिका साहेबराव दिग्रसकर ७९.८३ टक्के प्रथम, भुमिका प्रमोद चौधरी ६१ टक्के व्दितीय तर देवयानी आनंदा मंदाणी ही ५६.१७ टक्के गुण घेवुन महाविद्यालयातून तृतीय आली आहे.
विज्ञान विभागाचा निकाल ९९.८० टक्के, वाणिज्य विभागाचा निकाल १०० टक्के, कला विभागाचा निकाल ८४.४४ टक्के तर व्होकेशनल विभागाचा निकाल ८४ टक्के लागला आहे.
यश प्राप्त केलेल्या सर्व विद्याथ्र्यांचे जागृत नवयुवक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गिरीश गांधी, उपाध्यक्ष संतोष क्षिरसागर, सचिव डॉ.मनोहर आंडे, सहसचिव शशिकांत बेलसरे, आनंदराव देशमुख, कोषाध्यक्ष के.डी.वैद्य, व्यवस्थापक अरुण वानखडे, सहव्यवस्थापक निलेश रडके, सदस्य राजेश गांधी, मधुकर डाफे, आप्पासाहेब चौधरी, रोशन माखिजा, योगेश देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य विजय आडे, उपप्राचार्य संजय भोंडेकर, पर्यवेक्षक विजय गजभे, सर्व वर्गशिक्षक, विषय शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.