6 C
New York
Wednesday, April 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

अध्यक्ष रामराव वानखडे यांचे मार्गदर्शनाखाली उत्क्रांती नागरी सहकारी पतसंस्थेचा ग्राहक मेळावा

शेंदुरजनाघाट – उत्क्रांती नागरी सहकारी पतसंस्था मर्या जरुड शाखा शेंदुरजनाघाट येथे नुकताच महात्मा फुले सभागृह येथे ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या ग्राहक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष उत्क्रांती नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रामराव वानखडे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते तर विदर्भ बँक असोसिएशनचे संचालक राजेंद्र आंडे, अर्बन को-ऑपरेटिव्ह असोशिएशन नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद पोक्से, माजी नगराध्यक्ष जगदीश काळे, सुरेंद्र आंडे, पालक संचालक अॅड.प्रभाकर सावरकर, जनता शिक्षण संस्थेचे सचिव मोहन गणोरकर, डी.बी.गोरडे, माजी प्राचार्य प्रकाश देवते, पालक संचालक वसंत होले, शिवनारायण अढाऊ, अशोक लिखितकर, शरद मेंढे, उमेश हजारे, विनोद घोरपडे यांचेसह सर्व संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याच्या सुरुवातीला उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलित करुन महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पुजन हारार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी उपाध्यक्ष नगरपरिषद विशाल सावरकर, तुषार दवंडे, रमेश वाकुलकर, विनोद तडस या ठेवीदार, कर्जदार व ग्राहकांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्क्रांती पतसंस्थेचे संचालक गजानन बिजवे यांनी तर शेंदुरजनाघाट शाखेचे पालक संचालक अॅड.प्रभाकर सावरकर यांनी माहिती दिली. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशन नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी शरद पोक्से यांनी पतसंस्थेच्या व्यवहार व नियमाबाबत माहिती दिली तसेच प्रमुख मार्गदर्शक राजेंद्र आंडे यांनी उत्क्रांती नागरी सहकारी पतसंस्था व उत्क्रांती गृपच्या विश्वसार्हतेबद्दल माहिती देवून उत्क्रांती पतसंस्था कशा प्रकारे भरभराटीला येईल त्याबाबत मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाध्यक्ष उत्क्रांती नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रामराव वानखेडे यांनी उत्क्रांती पतसंस्थेबद्दल माहिती देऊन शेंदुरजनाघाट शाखेबाबत माहिती देऊन सहकार्य करण्याची आवाहन उपस्थित ग्राहकांना केले.
यावेळी महिला व पुरुष ग्राहकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक सी.टी.पठाण तर उपस्थितांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.अशोक खोपे यांनी केले. कार्यक्रमाकरिता सरव्यवस्थापक राजेंद्र शेलकर, शेदुरंजनाघाट शाखा व्यवस्थापक राजेंद्र वाडबुदे, कॅशियर प्रविण अंबांडकर, लिपिक ऋषिकेश बन्सोडकर, अमोल कडू, चंद्रशेखर वानखडे, कर्मचारी व सर्व संग्राहकांनी परिश्रम घेतले.

Related Articles

ताज्या बातम्या