7 C
New York
Tuesday, April 8, 2025

Buy now

spot_img
spot_img

बारावीच्या परीक्षेचा तालुक्याचा निकाल ९२.५१ टक्के जागृतचा कैवल्य प्रथम तर सुमित पोहणे व हिमांतनी धोटे तालुक्यात व्दितीय

वरुड – महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा वरुड तालुक्याचा निकाल ९१.५१ टक्के लागला आहे. तालुक्यातील शहीद स्मृती ज्युनिअर कॉलेज बेनोडा (शहीद), श्रीमती जे.एच.देशमुख ज्युनिअर कॉलेज जरुड व श्रीमती एन.मानकर ज्युनिअर कॉलेज राजुरा बाजार व आर.जी.देशमुख ज्युनियर कॉलेज चांदस वाठोडाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
विशेष म्हणजे जागृत महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा विद्यार्थी कैवल्य उत्तम बन्सोड यांने ९०.६७ टक्के गुण घेवुन तालुक्यातुन प्रथम, शंकरराव बंदे महाविद्यालयाचा सुमित गणपत पोहणे तर महात्मा फुले कला, वाणिज्य व सितारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालयाची हिमांतनी सोमेश्वर धोटे यांना अनुक्रमे प्रत्येकी ८५.५० टक्के गुण मिळाल्याने तालुक्यात व्दितीय तर श्रीमती जे.एच.देशमुख ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थिनी अनुष्का शरद राऊत ही तालुक्यातून तृतीय आली आहे.
या परीक्षेमध्ये शहरातील महात्मा फुले आर्ट अॅन्ड कॉमर्स व सितारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालयाचा ९२.५१ टक्के, शेंदुरजनाघाट येथील जनता हायस्कुल अॅन्ड स्व.एन.जी.मोघे ज्युनियर कॉलेजचा ९६.२९ टक्के, वरुडच्या न्यु इंग्लिश ज्युनियर कॉलेजचा ९२.६२ टक्के, बेनोडा येथील शहीद स्मृती विद्यालय अॅन्ड एस.एस.फरकाडे ज्युनियर कॉलेजचा ९०.६२ टक्के, जरुड येथील पांडुरंगजी गुलाबराव राऊत ज्युनियर कॉलेजचा ९०.६२, वसंतराव नाईक हायस्कुल अॅन्ड जे.एच.देशमुख आर्ट ज्युनियर कॉलेजचा ९६.३४ टक्के, वरुडच्या जागृत आर्ट ज्युनियर कॉलेजचा ९५.७६ टक्के, राजुरा हायस्कुल अॅन्ड ज्युनियर कॉलेज राजुरा हायस्कुलचा ९३.३३ टक्के, लोणी येथील आर्ट अॅन्ड कॉमर्स ज्युनियर कॉलेजचा ९४.८२, आर.जी.देशमुख ज्युनियर कॉलेज चांदस वाठोडा १०० टक्के, वरुड उर्दु सेकंडरी अॅन्ड हायर सेकंडरी विद्यालयाचा ८५.३८ टक्के, स्व.शंकरराव बंदे ज्युनियर कॉलेजचा ९६.७२, टेंभुरखेडा येथील श्री एम.यु.विद्यालय अॅन्ड श्रीमती ए.माहुलकर ज्युनियर कॉलेजचा ९१.१७, हातुर्णा येथील स्व.एस.पी.ठाकरे हायर सेकंडरी स्कुलचा ८१.०८ टक्के, लिंगा येथील स्व.दौलतराव शेळके उच्चमाध्यमिक विद्यालयाचा ९२.८५ टक्के लागला तर व्होकेशनल विभागातील महात्मा फुले आर्ट अॅन्ड कॉमर्स व सितारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय व्होकेशनलचा ९१.१७ टक्के, जनता हायस्कुल अॅन्ड स्व.एन.जी.मोघे ज्युनियर कॉलेज शेंदुरजनाघाट व्होकेशनलचा ९२.४५ टक्के, न्यु इंग्लिश ज्युनियर कॉलेज वरुड व्होकेशनलचा ८८ टक्के, शहिद स्मृती विद्यालय अॅन्ड एस.एस.फरकाडे ज्युनियर कॉलेज बेनोडा व्होकेशनलचा १०० टक्के, जरुड येथील जी.एच.देशमुख आर्ट ज्युनियर कॉलेज व्होकेशनलचा १०० टक्के, जागृत आर्ट ज्युनियर कॉलेज वरुड व्होकेशनलचा ८४.६१ टक्के, आर्ट अॅन्ड कॉमर्स ज्युनियर कॉलेज लोणी व्होकेशनलचा ७१.४२, आर.जी.देशमुख ज्युनियर कॉलेज चांदस वाठोडा व्होकेशनलचा ९२.८५ टक्के तर श्रीमती एन.मानकर ज्युनियर कॉलेज राजुरा बाजार व्होकेशनलचा १०० टक्के लागला आहे.
जागृत महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा विद्यार्थी कैवल्य उत्तम बन्सोड यांने ९०.६७ टक्के गुण घेवुन तालुक्यातुन प्रथम, शंकरराव बंदे महाविद्यालयाचा सुमित गणपत पोहणे तर महात्मा फुले कला, वाणिज्य व सितारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालयाची हिमांतणी सोमेश्वर धोटे यांना अनुक्रमे प्रत्येकी ८५.५० टक्के गुण मिळाल्याने तालुक्यात व्दितीय तर श्रीमती जे.एच.देशमुख ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थिनी अनुष्का शरद राऊत ही तालुक्यातून तृतीय आली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या