-0.6 C
New York
Wednesday, April 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

सिद्धटेकला नवीन डाक कार्यालय सुरु

कर्जत : प्रतिनिधी
 अष्टविनायकापैकी एक असलेल्या कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे नुकतेच नवीन डाक कार्यालय सुरु झाले आहे. सिद्धटेक शाखा डाकघर हे राशीन उपडाकघर अंतर्गत कामकाज करणार आहे. या डाक कार्यालयाचा पिनकोड ४१४४०३ हा असणार आहे.
सिद्धटेक येथे मनी ऑर्डर, पोस्टाने पाठवायचे प्रसाद पाकिट व तिकीट विक्री याचा व्यवसाय अधिक प्रमाणात आहे. सिद्धटेक येथे नवीन डाक कार्यालय झाल्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नवीन डाक कार्यालयाचा उद्घाटन सोहळा नुकताच अहमदनगर विभागाचे वरिष्ठ डाक अधीक्षक बी. नंदा व कर्जत उपविभागाचे उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला.
यावेळी संतोष घागरे, कैलास भुजबळ, सुनील धस, अशोक मोकाशे, गोविंद पवार, कार्तिकी खेडकर, सोनाली भारमल,संजय राऊत,लक्ष्मण शेटे, सुरज तोरडमल आदी  उपस्थित होते. यावेळी सिद्धिविनायक ट्रस्ट सिद्धटेक, ग्रामपंचायत सिद्धटेक व ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य लाभले. दर्शना लोटे यांनी सिद्धटेक येथील प्रथम शाखा डाकपाल म्हणून म्हणून तात्पुरता पदभार स्वीकारला.
 सिद्धटेक परिसरातील ग्रामस्थांनी या नवीन डाक कार्यालय मार्फत मिळणाऱ्या सर्व डाक सेवांचा व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांनी केले. भारत सरकारच्या डाक विभागा अंतर्गत विविध योजना व सेवा ग्रामस्थांसाठी आहेत. कार्यालयीन दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत विविध डाक सेवांचा लाभ  सर्व पात्र ग्राहकांना सिद्धटेक या नवीन डाकघरामध्ये घेता येतील, असे बी. नंदा यावेळी म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या